Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:43 IST2022-10-06T15:34:55+5:302022-10-06T15:43:37+5:30
Vande Bharat Express Accident: मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज अपघात झाला आहे. सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला.

Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली
अहमदाबाद - मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज अपघात झाला आहे. सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जे.के. जयंती यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ३० सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी २ वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे ४९२ किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते.