अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारमधील 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:47 IST2024-04-17T16:46:28+5:302024-04-17T16:47:35+5:30
भरधाव वेगाने मागून येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

फोटो - आजतक
गुजरातमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर नडियादजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. भरधाव वेगाने मागून येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती.
कारमधील 10 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यातील 8 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. याशिवाय एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती.