शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Accident in Rewari: अस्थी विसर्जनावरुन येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, महिला-मुलांसह 5 जणांचा मृत्यू; 12 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:06 IST

Accident in Rewari: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थल गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रेवाडी: हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जनावरुन परतत असताना एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी आहेत. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात NH-48 वर ऑडी गावाजवळ हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर गाडी मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोराने धडकली. या अपघातातील 12 जखमींना बावल येथील आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रूझर कारमध्ये 17 जण होते असे सांगण्यात येत आहे. क्रुझर कारमधील कुटुंबीय हरिद्वारला अस्थी विसर्जन केल्यानंतर जयपूरच्या सामोद गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

ट्रक चालक फरारही धडक इतकी जोरदार होती की, क्रूझरचा चक्काचूर झाला. भानुराम(35), महेंद्र(33), आशिष(15), सुमा देवी(35) आणि भोरी देवी(95) यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. महामार्गावरून जाणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलीस त्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातharidwar-pcहरिद्वारRajasthanराजस्थानDeathमृत्यू