भीषण! भरधाव कारने Swiggy च्या डिलिव्हरी बॉयना चिरडलं; 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:12 IST2022-03-03T15:11:10+5:302022-03-03T15:12:37+5:30
Four swiggy delivery boy killed : एका कारच्या चालकाने दोन बाईकवर असलेल्या स्विगी कंपनीच्या चार डिलिव्हरी बॉयला चिरडलं आहे.

फोटो - आजतक
नवी दिल्ली - दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कारने Swiggy च्या डिलिव्हरी बॉयना चिरडलं आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, गुरुग्रामच्या गोल्फ कोर्टवर भरधाव वेगात आलेल्या एका कारच्या चालकाने दोन बाईकवर असलेल्या स्विगी कंपनीच्या चार डिलिव्हरी बॉयला चिरडलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर डिलिव्हरी बॉयना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. कार चालकाने डिलिव्हरी बॉयना चिरडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार आणि कार चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरुग्राम डीएलएफ फेज वन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डिलिव्हरी बॉय हे रोडच्या शेजारी उभे होते अशी माहिती मिळत आहे. यामध्ये कार आणि बाईक देखील डॅमेज झाल्य़ा आहे. गुरुग्राम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे