Accident: भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 19:15 IST2022-09-11T19:14:28+5:302022-09-11T19:15:06+5:30
Accident: हिमाचल प्रदेशमधील ऊना येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सदर ठाणे उना अंतर्गत कुठार कला येथे घडली.

Accident: भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू
सिमला - हिमाचल प्रदेशमधील ऊना येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सदर ठाणे उना अंतर्गत कुठार कला येथे घडली.
पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री संतोषगड येथून ऊना येथे जात असलेली पंजाबचा परवाना असलेली कार कुठार येथे पोहोचल्यावर खांबावर आपटली. त्यानंतर शेतामध्ये जाऊन उलटली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार उभी केली.
या अपघातात राजन जसवाल आणि अमल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विशाल चौधरी, सिमरनजित सिंह आणि अनूप सिंह यांना उना येथील रुग्णालयात आणण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
उनाचे एसपी अर्जित सेन यांनी सांगितले की, पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांना माहिती दिली आहे. आता पुढील कारवाई केली जात आहे. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांमध्ये शोकाचे वातावरण आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.