Accident on Express-Way near Noida; Seven people were killed | नोएडाजवळ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; सात जण ठार
नोएडाजवळ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; सात जण ठार

नवी दिल्ली : ईस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेस-वेवर नोएडाजवळ झालेल्या रविवारी रात्री झालेल्या अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला, तर सहा लोक गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक रणविजय सिंह यांनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने व्हॅनला धडक दिल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. 


बुलंदशहर येथील गुलावठीमध्ये विवाह सोहळ््यात सहभागी होण्यासाठी ही मंडळी जात होती. यामध्ये हरियाणाच्या जनपद वल्लभगडचे रहिवासी झाकीर, आसीम, शमशीर, रिहाना, सुमाईला, फरजाना, शबनम, अक्सा, मुशर्रफ, रुबियाना, फरहान, कुमारी सिया यांचा समावेश होता. यातील शमशीरा, झाकीर, आसीम, रिहाना, सुमाईला, फरजाना यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारादरम्यान अक्सा हिचा मृत्यू झाला. 


जखमींवर दिल्लीत उपचार सुरू असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

Web Title: Accident on Express-Way near Noida; Seven people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.