अन्याय : मानवाधिकार कार्यकर्त्यांची नाराजी; जबाबदार लोकांवर कारवाईची मागणीनवी दिल्ली : एका मानवाधिकार कार्यकर्त्यास तो विकलांग असल्यामुळे दक्षिण दिल्लीच्या महागड्या बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल शनिवारी तीव्र नाराजी जाहीर केली.पक्षपाताचे बळी ठरलेले निपुण मल्होत्रा हे निपमान फाऊंडेशनचे सहसंस्थापक असून, जन्मजात अर्थोग्राइपोसिस नामक दुर्लभ आजाराने पीडित आहेत. सदर रेस्टॉरंटचा सुरक्षा जवान आणि व्यवस्थापकाने त्यांना शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने आपल्याला आत जाता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. स्वत: मल्होत्रा यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देताना सांगितले की, माझ्या मित्रांनी रात्रीच्या जेवणासाठी केया येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. माझे नऊ मित्र रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. आमचा एक मित्र व्हीलचेअरवर येईल तेव्हा तो टेबलपर्यत पोहोचेल याची काळजी घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा अपंगांना प्रवेश न देण्याचे रेस्टॉरंटचे धोरण असल्याचे कारण पुढे करून त्यांनी मला प्रवेश नाकारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)होळीमुळे दरवाजावर काही मद्यधुंद लोक उभे होते. त्यामुळे काळजी म्हणून आम्ही ठराविक संख्येतच लोकांना आत प्रवेश देत होतो. निपुण यांच्यासोबत आणखी दोन मुले होती. त्यांना आत जाण्याची परवानगी दिली असती तर आतील पुरुषांची संख्या वाढली असती. त्यामुळे एकट्या पुरुषाला आत प्रवेश नाही, असे आम्ही सांगितले. - प्रेमजितकुमार, रेस्टॉरंटचे महाव्यवस्थापक
विकलांगास रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला
By admin | Updated: March 8, 2015 01:30 IST