शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:25 IST

ABS and Two Helmets Mandatory for all New Two-Wheelers: केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाढते दुचाकी अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बाजारात येणाऱ्या नवीन दुचाकींसाठी (स्कूटर आणि मोटारसायकल) एबीएस (Anti-lock Braking System) सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन दुचाकी दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे. वाढते रस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्यू याला आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

सध्या एबीएस (Anti-lock Braking System) १२५ सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे हे. म्हणजे सध्या देशातील अंदाजे ४० टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाहीये. पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आले आहे.

एबीएस काय आहे? त्यामुळे काय होतं?

एबीएस (Anti-lock Braking System) हे वाहनांमध्ये वापरले जाणारे नव तंत्रज्ञान आहे. Anti-lock Braking System (ABS) हे एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे, जी वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरली जाते. 

एबीएस वाहनाच्या ब्रेक प्रणालीमध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यावर त्याची चाके लॉक होऊ नयेत. अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते. त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. ते टाळण्यासाठी आणि वाहन घसरू होऊ नये याची मदत होते.

एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळता येते. 

एबीएस अपघात रोखण्यासाठी किती परिणामकारक

जेव्हा अचानक ब्रेक लावला जातो, तेव्हा दुचाकीचे संतुलन बिघडले. पण, एबीएस असेल, तर दुचाकी अनियंत्रित होण्यापासून वा, घसरण्याचा धोका कमी असतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एबीएसमुळे दुचाकींचा अपघात होण्याचा धोका ३४ ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

दोन हेल्मेट हवेच

केंद्र सरकारकडून एबीएस बरोबरच नवीन दुचाकी देताना दोन बीआयएस प्रामाणित हेल्मेट देणे अनिवार्य केले जाणार आहे. सध्या एकच हेल्मेट देणे सक्तीचे आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू हे दुचाकी वापरणाऱ्याचे होत आहेत. बहुतांश वेळा मृत्यू डोक्याला मार लागल्याने होत आहेत. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलर