अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 10:28 IST2018-02-11T10:26:21+5:302018-02-11T10:28:35+5:30

अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे नित्याचंच झालं आहे. हॅकर्सनं अभिनेता अभिषेक बच्चन याला लक्ष्य केलं आहे. अभिषेक बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे.

Abhishek's Instagram account hack, Hackers wrote, I love You Katrina Kaif | अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif

अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif

नवी दिल्ली- अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे नित्याचंच झालं आहे. हॅकर्सनं अभिनेता अभिषेक बच्चन याला लक्ष्य केलं आहे. अभिषेक बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे. अभिषेकचं इन्स्टाग्रामवरचं अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यावरून चित्रविचित्र फोटोही पोस्ट केले आहेत. तसेच आय लव्ह यू कतरिना कैफ, असंही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लिहिण्यात आलं होतं.

एका फोटोत अमिताभ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आणि मागून अभिषेक अमिताभ बच्चन यांच्यावर डोळे वटारून पाहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये आय लव्ह यू कतरिना कैफ, असंही हॅकर्सनं लिहिलं आहे. हॅकर्सनं अभिषेकच्या अकाऊंटवरून पॅलेस्टाइनचाही झेंडाही पोस्ट केला आहे.



विशेष म्हणजे अभिषेक बच्चन यांनी लागलीच स्वतःच्या अकाऊंटची हॅकर्सच्या तावडीतून सुटका करून घेतली आहे. आणि हॅकर्सनी प्रसिद्ध केलेले फोटोही काढून टाकले आहेत. यापूर्वी अनुपम खेर आणि निमरत कौर यांचंही टि्वटर अकाऊंट हॅक झालं होतं. विशेष म्हणजे अनुपम खेर, निमरत कौर आणि अमिताभ बच्चन या तिघांनीही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या सभेला उपस्थिती दर्शवली होती. या तिघांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबर सेल्फीही घेतला होता. त्यामुळेच या तिघांची अकाऊंट्स हॅकर्सनं हॅक केल्याची शंका उपस्थित केली जातेय. 

Web Title: Abhishek's Instagram account hack, Hackers wrote, I love You Katrina Kaif