अभिजित कोळपे बातमी : पुणे-जेजुरी रेल्वे शटल सुरू करा
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:17+5:302015-02-14T23:50:17+5:30

अभिजित कोळपे बातमी : पुणे-जेजुरी रेल्वे शटल सुरू करा
>जिमाची मागणी : जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची बैठकजेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथे असलेल्या औद्योगिक वसाहत उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व सुरक्षित आहे. येथे देशभरातून उद्योग आले पाहिजेत, असा प्रयत्न जिमाचा असून वसाहतीच्या प्रगतीसाठी पुणे-जेजुरी रेल्वे शटल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सुभाष देसाई यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी दिली. त्याचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची शुक्रवारी संघटनेच्या नियोजित सभा झाली. अध्यक्षस्थानी उद्योजक संघटनेचे (जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्यु. असोसिएशन) जिमाचे संस्थापक बी. एम. ताकवले होते. बैठकीला डॉ. रामदास कुटे, औद्योगिक वसाहतीचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र भोसले, उपभियंता संजय कुलकर्णी, महावितरणचे एम. एन. रॉय, बी. एस. एन. एल.चे बाळासाहेब जाधव, बँक ऑफ महाराष्ट्र, सुवर्णयुग बँक आदी बँकांचे अधिकारी, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, जिमाचे पदाधिकारी व उद्योजक रवी जोशी, पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, शकिल शेख, अंकुश सोनवणे आदींसह ८० सदस्य उपस्थित होते. वसाहतीत मोठ्या उद्योजकांनी लहान उद्योग टिकविण्यासाठी सहकार्याची भावना ठेवावी. येणार्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांनी संघटनेत सहभागी व्हावे. कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवावा; तसेच वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्यावे, नवीन येणार्या उद्योजकांना सहकार्य करावे, आपापल्या कारखान्यातील कामगारांचे हित जोपासावे, तसेच जिमाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या इमारतीसाठी मदत करावी, असे आवाहन बी. एम. ताकवले यांनी केले आहे. जेजुरी पोलिस ठाण्याचे स. पो. नि. रामदास शेळके यांच्या योग्य नियोजनामुळे वसाहतीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जात आहे. त्यांचे कारखानदारांना सहकार्य व मार्गदर्शन असते. म्हणून त्यांचे विशेष ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे. रवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग सोनवणे यांनी आभार मानले. फोटो ओळ : जिमाच्या बैठकीत उद्योजकांना मार्गदर्शन करताना डॉ. रामदास कुटे. ०००००