अभिजित कोळपे बातमी : जिल्हा परिषदेत शाळेतही खासगीप्रमाणे सुविधा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30
प्रदीप गुरव : मदनवाडी शाळेत स्नेहसंमेलन

अभिजित कोळपे बातमी : जिल्हा परिषदेत शाळेतही खासगीप्रमाणे सुविधा
प रदीप गुरव : मदनवाडी शाळेत स्नेहसंमेलनभिगवण : भरमसाट फी आकारणार्या खासगी शाळेत मिळणार्या सुविधा आता जिल्हा परिषद शाळेत मिळत आहेत. त्यामुळे शाळेची गुणवत्ता सुधारत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी खासगी शाळेकडे पाठ फिरवून जिल्हा परिषेच्या शाळेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र काही दिवसांत दिसून येत आहे, असे मत इंदापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप गुरव यांनी व्यक्त केले. मदनवाडी (ता. इंदापूर) येथील शाळेच्या स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. या वेळी शाळेकडून करण्यात आलेल्या शाळेच्या कंपाऊंडची मागणी त्वरित मान्य केली. या वेळी निधीही उपलब्ध करण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या निर्मलग्राम योजनेवर नाटिका सादर करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापक विष्णू मारकड यांनी प्रास्ताविक केले. अजिनाथ वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. शरद भुजबळ यांनी आभार मानले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्या मेघनाताई बंडगर, सरपंच सारिका बंडगर, उपसरपंच आबासाहेब देवकाते, तुकाराम बंडगर उपस्थित होते. फोटो ओळी : निर्मलग्राम योजनेवर नाटिका सादर करताना मदनवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी.२००३२०१५-बारामती-०५