अभिजित कोळपे बातमी : अंगणवाड्यांना मोफत साहित्य वाटप
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:22+5:302015-02-14T23:52:22+5:30

अभिजित कोळपे बातमी : अंगणवाड्यांना मोफत साहित्य वाटप
>कुरकुंभ परिसर : ग्रामस्थांचा लोकसहभागकुरकुंभ : आठ अंगणवाड्यांमध्ये ग्रामस्थांच्या लोकसहभागातून विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये दिवसेंदिवस सर्वसामान्य व गरजू, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी या विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरणात पायाभूत शिक्षण घेता यावे, यासाठी आदर्श अंगणवाडी संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहभागातून विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच जयश्री भागवत यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून टी. व्ही., गॅस, कुकर, कचराकुंडी, पाण्यासाठी बादल्या, टफ, पंखे, घड्याळ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे स्वागत सर्वच स्तरांवर होत असून येथील पायाभूत सुविधा सुधारणावर भर देण्यात येणार आहे, असे अंगणवाडीसेविकांनी या वेळी सांगितले. एकात्मिक बालविकास अधिकारी तानाजी कोद्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी उपसरपंच अरुण भागवत, ग्रामपंचायत सदस्य रशीद शेख, सनी सोनार, अरुण साळुंके, राहुल भंडलकर, इकबाल शेख, संदीप भागवत, शुभांगी म्हेत्रे, शुभांगी बोबडे, शांताराम जगताप, नरसिंग राठोड उपस्थित होते. फोटो ओळ : कुरकुंभ येथील अंगणवाडीस मोफत साहित्यांचे वाटप करताना सरपंच जयश्री भागवत आदी. (छायाचित्र : रिजवान शेख)14022014-िं४ल्लि-10