अभिजित कोळपे बातमी : शिवाजी कुस्ती संकुलास ५१ हजारांची देणगी
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:28+5:302015-02-14T23:50:28+5:30

अभिजित कोळपे बातमी : शिवाजी कुस्ती संकुलास ५१ हजारांची देणगी
>सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी कुस्ती संकुलास पुरंदरमधील ज्येष्ठ मल्ल बबनराव घाटे यांच्या वतीने रोख ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. पुणे मार्केट कमिटीचे संचालक नंदकुमार जगताप यांनी संकुलाच्या वतीने देणगी स्वीकारली.सासवड येथे नुकत्याच पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धा झाल्या. दहा वेगवेगळ्या वजन गटात झालेल्या या स्पर्धेत येथील शिवाजी कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे ही देणगी दिल्याचे घाटे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर कुस्तीगीर संघाचे सदस्य मोहन जगताप, कुंडलिक जगताप, कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक विष्णुपंत पाटील, संभाराजे जगताप, बापू मोकाशी व कुस्ती संकुलातील मल्ल उपस्थित होते. पुरंदरच्या ग्रामीण भागातील मल्लांसाठी सासवड येथे माजी आमदार चंदूकाका जगताप व संजय जगताप यांच्या मार्गदशर्नाखाली अद्ययावत शिवाजी कुस्ती संकुल उभारले आहे. यात माती, गादी विभाग, व्यायाम साहित्य, राहणे व खुराकाची सोय करण्यात आली असल्याने मल्लांना याचा फायदा होत असल्याचे नंदकुमार जगताप यांनी या वेळी सांगितले.फोटो ओळी : सासवड येथील शिवाजी कुस्ती संकुलास बबनराव घाटे यांनी ५१ हजारांची देणगी दिली. या प्रसंगी उपस्थित नंदकुमार जगताप, मोहन जगताप, विष्णुपंत पाटील आदी.