प्रयागराज : संगमात स्नान करून बहुतेक भाविक संगम परिसरात परतत असताना, ते सोबत गंगाजल आणि राम नावाचा दुपट्टा कुंभमेळ्याचे प्रतीक म्हणून खरेदी करत सोबत घेऊन जातील.हे राम नामाचे दुपट्टे लखनौ रोडवर असलेल्या गोपालगंजच्या अहलादगंज गावात बनवले जातात. या गावात सुमारे सातशे कुटुंबे हे दुपट्टे तयार करतात. या गावातील मुस्लीम रंगकर्मी शतकानुशतके ‘रामनामी दुपट्टा’ छापत आहेत. स्वत:च्या श्रद्धा बाजूला ठेवत ते हिंदूंच्या श्रद्धेसाठी काम करतात.
दुपट्ट्यामुळे मिळते भाकरीरामनामी दुपट्टा छापणारा अब्दुल कामावर खुश आहे. मुस्लीम असूनही रामनामी दुपट्टा छापण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, धर्माचा पोटाशी काहीही संबंध नाही. पोटाला अन्नाची गरज असते, मग ते कोणत्याही धर्माचे असो. कोणाकडेही हात पसरण्यापेक्षा रामाकडे हात पसरवणे चांगले. रामनामी दुपट्टा छापून आम्हाला भाकरी मिळत आहे.
एका दुपट्ट्यामागे मिळतात ३० पैसेहिंदूंच्या धार्मिक विधी, चालीरीती आणि विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू ही कुटुंबे वर्षानुवर्षे करत आहेत. गोपालगंजमधील सुमारे दीड हजार रंगकर्मी कुटुंबांचा येथे वडिलोपार्जित हाच व्यवसाय आहे. अब्दुला म्हणाले की, आम्हाला मुंबईतील मतीन सेठ यांच्या फर्मकडून राम नावाचा दुपट्टा छापण्याचे काम मिळाले आहे. एक दुपट्टा छापण्यासाठी आम्हाला ३० पैसे मिळतात. आम्ही त्यावर रंगकाम करतो. हा दुपट्टा ३० ते ५० रुपयांना विकला जातो.