शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:52 IST

Bageshwar Maharaj : सुरत येथील हिरे व्यापाऱ्याने धीरेंद्र शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे.

Bageshwar Dham Baba | सुरत : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. ते आता बिहार दौऱ्यावर असून तिथे त्यांचा कार्यक्रम पार पडत आहे. धीरेंद्र शास्त्री काही दिवसांनी गुजरातमधीलअहमदाबाद, राजकोट आणि सुरत या ठिकाणी भव्य दरबार घेणार आहेत. खरं तर बिहारपाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध होत आहेत. अशातच सुरत येथील जनक बाबरिया या हिरे व्यापाऱ्याने शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे.

बिहारमध्ये मंत्री तेजप्रताप यादव यांच्या विरोधानंतरही धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार पार पडत आहे. सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याने आव्हान देताना म्हटले की, जर मला त्यांच्या भव्य दरबारात बोलावले गेले तर मी पॉलिश केलेल्या हिऱ्यांचे एक पाकीट घेऊन तिथे जाईन आणि जर त्यांनी मला सांगितले की, त्यात किती पॉलिश केलेले हिरे आहेत, तर मी ते २ कोटी रूपयांच्या हिऱ्यांचे पाकीट त्यांच्या चरणी अर्पण करीन आणि त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे मान्य करेन.

धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबाराला विरोध२२ तारखेला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी गुजरातला जाणार असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. शास्त्री यांचा दरबार २६ आणि २७ मे रोजी सुरत येथे होणार आहे. या दरबारात चमत्कार, अंधश्रद्धा आणि त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगितले जाते, त्याला उघडपणे विरोध करणार असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणीशास्त्री यांच्या दरबारात एवढे लोक येत आहेत, कारण सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. पण आम्ही सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. सुरत, अहमदाबाद आणि राजकोट येथील दिव्य दरबाराची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार असल्याचे व्यापाऱ्याने स्पष्ट केले. 

 

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामGujaratगुजरातSuratसूरतahmedabadअहमदाबाद