शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:02 IST

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात.

रायपूर: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या शास्त्री यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. रायपूर येथे एक मोठे विधान केले असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडे चंद्रखुरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. चंद्रखुरी या जागेचे नाव बदलून कौशल्य धाम ठेवावे, असे ते म्हणाले. मागील सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले. ते दिशाहीन लोक होते, त्यामुळे येथे धर्मांतर वाढले, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. तसेच मी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जाती मोजण्यात काहीच अर्थ नाही, किती गरीब आहेत आणि किती त्रस्त आहेत याचा हिशोब व्हायला हवा. मंदिरे पाडू नका, चादरी अर्पण करणे हा चमत्कार आहे, मेणबत्ती लावणे हा चमत्कार आहे, मग मी जर दैवी दरबार लावला किंवा हनुमान चालीसा वाचली तर लोकांचे पोट का दुखते, असा प्रश्न त्यांनी केला. 

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवंखरं तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या याच कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी धर्मांतराबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात प्रचंड प्रमाणात धर्मांतर होत आहे. विशेषतः जशपूरमध्ये लोक धर्मांतर करत आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप सिंग जुदेव यांच्या कुटुंबाने घरवापसी मोहीम सुरू केली. त्यांनी लोकांचे पाय धुवून त्यांना घरी परतायला भाग पाडले. दिलीप सिंग यांच्यानंतर त्यांचा मुलगा ही जबाबदारी पार पाडत आहे.

दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांच्या घरवापसीच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भाजपा विरोधी पक्षात असताना धर्मांतर होत असल्याच आरोप केला. राज्यात आता भाजपाचे सरकार आले आहे आणि केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाने पोकळ विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये. धर्मांतराच्या विरोधात कायदा करायला हवा, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडbageshwar dhamबागेश्वर धामBJPभाजपाcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री