शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
4
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
5
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
6
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
7
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
8
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
9
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
10
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
11
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
12
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
13
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
14
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
15
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
16
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
17
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
18
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
19
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
20
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चे ‘मोहल्ला क्लिनिक’ भाजपाचे ‘आयुष्मान भारत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:22 IST

दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे.दिल्लीच्या १४ जिल्ह्यांत व अनधिकृत कॉलन्यांमध्ये भाजप आरोग्य शिबिरे लावून ‘आयुष्मान भारत’चा प्रचार करण्यात गुंतला आहे. या शिबिरांत लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्याबरोबरच दिल्लीच्या बाहेरील रहिवाशांना आधार किंवा व्होटर कार्ड पाहून संधी मिळताच ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत आरोग्य विमा कार्ड बनवण्यात येणार आहे. भाजप देशातील गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देत असताना ही योजना केजरीवाल सरकार दिल्लीत लागू करीत नाही, हा संदेश या मोहिमेद्वारे जनमानसापर्यंत पोहोचवायचा आहे.भाजपने निवडणूक आयोगाद्वारे आरोग्य शिबिरे लावण्यासाठी औपचारिक मंजुरी पदरात पाडून घेतलेली आहे.लोकसभा निवडणुकीची ही संधी साधून भाजप मतदारांमध्ये आतापासूनच पुढच्या निवडणुकीसाठी बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नाला लागली आहे.भाजप मीडिया सेलचे प्रमुख नीलकांत बक्षी यांनी लोकमतला सांगितले की, केंद्राकडून चालवल्या जात असलेल्या योजनेतगरीब कुटुंबाला मोफत पाच लाख रुपयांचा विमा दिला जात आहे. यामुळे गरीब लोक पैशाच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. दिल्ली सोडून देशभरातील हजारो लोक ‘आयुष्मान भारत’मध्ये गंभीर आजारांवर उपचार घेऊन निरोगी जीवन जगत आहेत.>रांगापासून झाली सुटकादिल्ली सरकारने मोहल्ला क्लिनिक योजना लोकांना घराजवळच मोफत उपचार देण्यासाठी सुरू केली आहे. ताप, सर्दी, खोकला, चर्मरोग, उलट्या याबरोबरच मधुमेहींना याद्वारे औषधी मिळतील. यामुळे दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांतील गर्दी कमी झाली असून, छोट्या आजारांसाठी लोकांची रुग्णालयाच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका झाली आहे; परंतु राज्य सरकारने केंद्राची ‘आयुष्मान भारत’ योजना लागू केलेली नाही.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत