'त्या' 15 आमदारांच्या मदतीने 'आप'ला जिंकायचं उत्तर प्रदेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 10:46 AM2020-02-24T10:46:37+5:302020-02-24T10:47:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पूर्वी गुजरात मॉडेलच्या नावावर देशभरात प्रचार केला होता. गुजरातमधील विकासाच्या मुद्दावर त्यांनी मतदारांना आकर्षित केले होते. आता तोच फंडा अरविंद केजरीवाल राबविण्याच्या तयारीत आहेत. 

AAP wants to win Uttar Pradesh'' with the help of those 15 MLAs! | 'त्या' 15 आमदारांच्या मदतीने 'आप'ला जिंकायचं उत्तर प्रदेश !

'त्या' 15 आमदारांच्या मदतीने 'आप'ला जिंकायचं उत्तर प्रदेश !

Next

नवी दिल्ली - दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाचा उत्साह वाढला आहे. आता आम आदमी पक्षाची नजर देशाच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचे राज्या असलेल्या उत्तर प्रदेशवर लागली आहे.  दिल्लीतील 'विकासच्या मॉडेल'च्या नावावर 'आप'ची तयारी सुरू झाली आहे. आता उत्तर प्रदेशात 'आप'साठी मैदान तयार करण्यात येत असल्याचे आपचे प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्दावर लढवली जाणार आहे. भाजपच्या अनेक प्रयत्नानंतरही दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत विजय मिळव. त्यामुळे जनतेला विकास हवा हे स्पष्ट होत असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्यामध्ये 15 आमदार हे मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. आता हेच 15 आमदार आम आदमी पक्षासाठी उत्तर प्रदेशात मैदान तयार करणार आहेत. या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात खास जबाबदारी देण्यात येईल.  त्यासाठी स्थानिक मुद्दांवर काम करण्यात येणार असल्याचे संजय सिंह यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पूर्वी गुजरात मॉडेलच्या नावावर देशभरात प्रचार केला होता. गुजरातमधील विकासाच्या मुद्दावर त्यांनी मतदारांना आकर्षित केले होते. आता तोच फंडा अरविंद केजरीवाल राबविण्याच्या तयारीत आहेत. 

Web Title: AAP wants to win Uttar Pradesh'' with the help of those 15 MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.