“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 08:54 IST2024-04-04T08:52:57+5:302024-04-04T08:54:29+5:30

AAP Sanjay Singh News: भाजपावाल्यांना अरविंद केजरीवालांचा राजीनामा हवा आहे. काही झाले तरी ते देणार नाहीत, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

aap mp sanjay singh criticised bjp and central govt after bail from court | “केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका

“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका

AAP Sanjay Singh News: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. जेलमधून बाहेर पडल्यावर संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले. या सर्वांचा हिशेब होईल. देव नक्कीच धडा शिकवेल, असा घणाघात संजय सिंह यांनी केला. 

देशात भाजपाच्या सरकारने हुकूमशाही निर्माण केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा भाजपाला हवा आहे.अरविंद केजरीवाल अजिबात राजीनामा देणार नाहीत. तसेच ते दिल्लीतील दोन कोटी जनतेसाठी काम करत राहतील. भाजपावाले म्हणतात की ते भ्रष्ट लोकांना सोडणार नाहीत. मला भाजपा कार्यकर्त्यांची कीव येते, अशी टीका संजय सिंह यांनी केली.

दरम्यान, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याविरोधात मोहाली, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे गुन्हे दाखल केले, तर ते राजीनामा देतील का, असा सवाल संजय सिंह यांनी केला. तसेच आम आदमी पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते सर्वजण अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे संजय सिंह यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: aap mp sanjay singh criticised bjp and central govt after bail from court