दिल्लीत AAP ला झटका; माजी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांसह अनेक नेते भाजपात सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:53 PM2024-07-10T15:53:01+5:302024-07-10T15:53:09+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला दिल्लीत मोठा झटका बसला आहे.

AAP gets a blow in Delhi; Many leaders including former ministers, MLAs and corporators joined the BJP | दिल्लीत AAP ला झटका; माजी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांसह अनेक नेते भाजपात सामील

दिल्लीत AAP ला झटका; माजी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांसह अनेक नेते भाजपात सामील

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृ्त्वातील आम आदमी पक्षाला (AAP) दिल्लीमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बसपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

त्यांच्यासोबत दिल्लीतील छत्तरपूरचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार करतार सिंह तंवर, माजी आमदार वीणा आनंद, नगरसेवक उमेद सिंह फोगट, हिमाचल प्रदेशचे प्रभारी रत्नेश गुप्ता आणि सह - प्रभारी सचिन राय यांनीदेखील भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतले आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश झाला.

पटेल नगरचे माजी आमदार राज कुमार आनंद हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली मंत्रिमंडळात समाजकल्याण आणि एससी/एसटी मंत्री होते. अलीकडेच एप्रिल महिन्यात राजकुमार आनंद यांनी पक्षातील भ्रष्टाचाराबाबतच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याचा थेट संबंध मद्य धोरण प्रकरणाशी होता. याच प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
राजकुमार आनंद यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर नवी दिल्लीतून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पक्त 5629 मते मिळाली. तर, भाजपच्या बांसुरी स्वराज यांना 453185 आणि आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांना 374815 मते मिळाली. बांसुरी यांनी ही जागा 78370 मतांनी जिंकली होती. 
 

Web Title: AAP gets a blow in Delhi; Many leaders including former ministers, MLAs and corporators joined the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.