शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:12 IST

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी रोड शो दरम्यान जनतेला संबोधित केलं. भाजपा आणि काँग्रेस दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला.

गुजरातमधील विसावदर विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. आज आम आदमी पक्षाने येथे एक भव्य रोड शो आयोजित केला होता, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सहभागी झाल्या होत्या. या रोड शोद्वारे आपनेभाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील विसावदरमध्ये आपली ताकद दाखवली. पक्षाने गोपाल इटालिया यांना विसावदरमधून उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी रोड शो दरम्यान जनतेला संबोधित केलं. भाजपा आणि काँग्रेस दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला. "विसावदरच्या लोकांनी १८ वर्षे भाजपाला प्रवेश करू दिला नाही, आधी काँग्रेसला संधी दिली, आता यावेळी 'आप'ला संधी द्या" असं म्हटलं आहे.

"...तर मी राजकारण सोडून देईन"

केजरीवाल यांनी भाजपावर काँग्रेस आणि 'आप'च्या आमदारांना फोडून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याचा आरोप केला. त्यांनी स्टेजवरून आव्हान देत म्हटलं की, "मी तुम्हाला आव्हान देतो गोपाल इटालिया यांना फोडून दाखवा, जर तुम्ही त्यांना फोडू शकलात तर मी राजकारण सोडून देईन." यावर गोपाल इटालिया यांनी हसत हसत "सर, असं काही नाही" असं उत्तर दिलं.

केजरीवाल यांनी काँग्रेसवर साधला निशाणा

केजरीवाल यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही टीका केली आणि म्हटलं की "काँग्रेस हा एक नंबरचा फसवा पक्ष आहे." या विधानाद्वारे त्यांनी सूचित केलं की 'आप' आता स्वतःला बळकट करण्याच्या उद्देशाने गुजरातच्या राजकारणात प्रवेश करत आहे. भगवंत मान आणि आतिशी यांनी रोड शो दरम्यान जनतेकडून पाठिंबा मागितला आणि 'आप'चे "प्रामाणिक राजकारण" पुढे नेण्याबद्दल सांगितलं.

१९ जून रोजी होणार मतदान

गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जून आहे आणि उमेदवारी अर्जांची छाननी ३ जून रोजी होईल. उमेदवार ५ जूनपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. या पोटनिवडणुकीबाबत भाजपा, काँग्रेस आणि आप हे तिन्ही प्रमुख पक्ष आपापल्या पातळीवर विजयाचा दावा करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणGujaratगुजरात