शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अन्य कोणी सरसंघचालकांसारखं विधान केलं असतं तर भाजपानं पाकिस्तानात धाडलं असतं, 'आप'ची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 11:17 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सर्व स्तरातून टीका केली जात आहे.  ''भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ आल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते'', असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत यांच्या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र शब्दांत टीका नोंदवली आहे. 

आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर  "हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होती" अशा शब्दात  मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. 'जर हेच विधान दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने केले असते तर भाजपानं त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडले असते. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे.' असंही ते म्हणालेत.

नेमके मोहन भागवत काय म्हणालेत?भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ आल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) मुजफ्फरनगर येथे संघाच्या बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भागवत म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही लष्करी संघटना नाही. देशाला गरज पडल्यास आणि देशाच्या संविधानाने.... (भाषण करताना पॉझ घेतला) तर भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी सहा ते सात महिने लागतील. मात्र, आम्ही संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करून अवघ्या तीन दिवसात सैन्य उभारून सज्ज होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ती क्षमता आहे.''

देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.

भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाAAPआपRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ