Manish Sisodia CBI Arrest : मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:04 PM2023-02-27T18:04:03+5:302023-02-27T18:20:40+5:30

Manish Sisodia CBI Arrest Live News Update:  मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Aam Aadmi Party delhi deputy cm Manish Sisodia 5 days cbi custody liquor allegation Sanjay Singh criticized bjp | Manish Sisodia CBI Arrest : मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली

Manish Sisodia CBI Arrest : मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली

googlenewsNext

Manish Sisodia CBI Arrest Live News Update:  मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला की सीबीआय कोणत्याही परिस्थितीत तपास करू शकते.

मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार; भाजपा नेत्याचा दावा!

मनीष सिसोदिया यांचे वकील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर म्हणाले, निवडून आलेल्या सरकारला काय करायचे आहे, आज एक चौकशी स्थापन करण्यात आली आहे, ती देखील जेव्हा एलजीने घटनात्मक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली होती.

मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला होता. 

मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार

अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिसोदिया यांच्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के.कविता यांना लवकरच अटक केली जाईल, असं विधान विवेक व्यंकटस्वामी यांनी केलं आहे. 

"मद्य अबकारी कराच्या घोटाळ्यासंदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. के.कविता यांनाही लवकरच अटक केली जाईळ. पंजाब आणि गुजरात निवडणुकीवेळी के.कविता यांनी आम आदमी पक्षाला १५० कोटी रुपयांची मदत केली होती", असा आरोप भाजपा नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी केला आहे. 

मुंबईतही आप'चे निदर्शने

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर खोट्या प्रकरणामध्ये सीबीआय मार्फत अटक केल्याबद्दल आम आदमी तर्फे चर्चगेट स्थानक ते भाजप प्रदेश कार्यालय निषेध मोर्चा काढण्यात आला. 

आम आदमी पार्टी भारतात वेगाने वाढत आहे. संपूर्ण देशभर पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला चांगले यश मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीसमोर आपला टिकाव लागणार नाही, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला ग्रासलेले आहे. म्हणून या भीतीपोटी आपच्या मंत्र्यांना सीबीआय सारख्या सरकारी संस्थांमार्फत खोट्या, बनावट प्रकरणामध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचे भ्याड व घाणेरडे राजकारण केंद्रातील भाजप सरकार करत आहे, याचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टी मुंबई च्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. 

Web Title: Aam Aadmi Party delhi deputy cm Manish Sisodia 5 days cbi custody liquor allegation Sanjay Singh criticized bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.