शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याने केली जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत, भारतात शेकडो उड्डाणांवर परिणाम, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:07 IST

भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपन्यांकडे असलेल्या ए३२० श्रेणीतील विमानांमध्ये काही तांत्रिक बिघाड सापडला आहे. फ्रान्सस्थित एअरबस या विमान कंपनीने सूर्याची तीव्र किरणे काही विमानांमधील फ्लाईट कंट्रोल सिस्टिमसाठी आवश्यक असलेला डेटा खराब करू शकतात. तसेच हा डेटा जर चुकीचा निघाला तर विमानाच्या कंट्रोलवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. 

सध्या भारतामध्ये ५६० हून अधिक ए३२० विमाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरात आहेत. तसेच त्यामधील सुमारे २०० ते २५० विमानांमध्ये त्वरित तपास आणि बदलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यातील काही विमानांमधील सॉफ्टवेअर बदलावा लागणार आहे. तर काहीमधील हार्डवेअर थेटपणे रिप्लेस केला जाणार आहे. यादरम्यान, विमानांना काही काळ थांबवाले लागणार आहे. त्यामुळे उड्डाणे उशिरा होण्याची किंवा ती रद्द होण्याचीही शक्यता आहे.

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए) ने इर्मजन्सी नोटिस प्रसिद्ध करून विमानांमध्ये फ्लाईट कंट्रोल सांभाळणारा एक चांगला ईएलएसी कॉम्प्युटर लावणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. हल्लीच एका ए३२० विमान ऑटोपायलट सुरू असताना विनाकमांड किंचित झुकल्याचे समोर आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ईएलएसी मॉड्युलमध्ये काही त्रुटी असल्याचे समोर आले होते. याबाबत एअरबसच्या प्रवक्त्याने सांगितले की, या तांत्रिक समस्येचा आणि त्याच्या दुरुस्तीचा परिणाम सुमारे ६ हजार विमानांवर होऊ शकतो.

एअरबस कंपनीने सांगितले की, सूर्याकडून येणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे फ्लाईट कंट्रोल सिस्टिमशी संबंधित काही महत्त्वपूर्ण डेटा करप्ट करू शकतो. त्यामुळे जगभरात ए३२० श्रेणीतील विमानांच्या उड्डाणांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. एअरबसने हा एक गंभीर तांत्रिक दोष असल्याचे  म्हटले आहे. तर एअरबस ए३२० विमानांसाठी एक सॉफ्टवेअर फिक्सशी संबंधित अलर्ट मिळाल्यानंतर आम्ही सावधगिरी म्हणून काही पावलं उचलली आहेत, असे एअर इंडिया एक्स्प्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sun's rays disrupt flight controls, affecting 200+ Indian flights.

Web Summary : Hundreds of Indian flights face disruption due to a technical flaw in A320 aircraft. Sunlight can corrupt flight control data, potentially impacting plane control. Inspections and software/hardware changes are needed, causing delays and cancellations.
टॅग्स :airplaneविमानAir Indiaएअर इंडियाIndigoइंडिगो