शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सरकारी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचं गुपित ९ वर्षांनी उघडलं; अख्खं शिक्षण विभाग हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:00 IST

तिच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता शुमायालाला अटक करण्याची तयारी करत आहेत

बरेली - उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक महिला जी पाकिस्तानी नागरिक आहे तिने बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारी शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. तपासात जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा प्रशासन खडबडून जागं झाले. त्यांनी या शिक्षिकेला निलंबित करून तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. शिक्षण क्षेत्रात बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याचा हा प्रकार उघड होताच अनेकांनी नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शुमायाला खान असं प्राथमिक शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. तपासात तिने नोकरी मिळवण्यासाठी दिलेली कागदपत्रे बोगस असल्याचं उघड झालं. तिने अधिवास प्रमाणपत्र एसडीएम कार्यालायतून बनवले होते. त्याशिवाय इतर कागदपत्रेही बनावट होती. २०१५ साली शुमायाला खानची जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे होते. परंतु तिने दिलेली सगळी कागदपत्रे बोगस असल्याचं उघड झाले.

तहसिलदारांनी केलेल्या तपास रिपोर्टात स्पष्टपणे लिहिले होते की, शुमयला खानने निवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चुकीच्या तथ्यांचा आधार घेतला. तिची खरी ओळख उघड झाल्यानंतर, हे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात आले. यानंतर जिल्हा शिक्षण विभागानेही तिच्यावर कारवाई सुरू केली. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुमायला खानकडून अनेक वेळा स्पष्टीकरण मागितले मात्र तिने  सादर केलेली माहिती आणि कागदपत्रे तपासली गेली तेव्हा ती फसवी असल्याचे सिद्ध झाले.

शुमायाला खानने तिचे पाकिस्तानी नागरिकत्व लपवून आणि भारतीय रहिवासी असल्याचा खोटा दावा करून ही नोकरी मिळवली होती. शिक्षण विभागाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शुमायला खान या महिलेला सहाय्यक शिक्षिका पदावरून निलंबित केले. यानंतर नियुक्तीच्या तारखेपासून तिला पदावरून काढून टाकण्याचा आदेशही जारी करण्यात आला. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, फतेहगंज पश्चिमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्यात शुमायलाविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता शुमायालाला अटक करण्याची तयारी करत आहेत.

पाकिस्तानी असल्याचं उघड

कोणत्याही सरकारी नोकरीसाठी महत्त्वाचा कागदपत्र असलेलं अधिवास प्रमाणपत्र शुमायलाने फसवणूक करून बनवलं होतं. रामपूर येथील तहसीलदार कार्यालयाने त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की हे प्रमाणपत्र केवळ चुकीचे नव्हते तर ते बनवण्यासाठी दिलेली कागदपत्रेही खोटी आढळली. ती भारतीय नागरिक आहे आणि रामपूरमध्ये राहते असा दावा महिलेने केला होता. परंतु तपासात ती प्रत्यक्षात पाकिस्तानी नागरिक होती आणि तिने दिलेली माहिती खोटी होती हे दिसून आले. शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि शुमायालाला निलंबित करत तिची नियुक्ती रद्द केली. 

टॅग्स :GovernmentसरकारTeacherशिक्षकPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश