शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'प्रधानमंत्री आवास' देतो म्हणून सरपंचाने महिलेला नेलं जंगलात अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:18 IST

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका सरपंचावर विवाहित महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका सरपंचावर विवाहित महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री आवास देतो असे सांगून सरपंचाने तिला बोलावले आणि जंगलात नेऊन बलात्कार केला. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

माहितीनुसार, ग्वालियरच्या लुटपुरा भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सरपंचाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिची मुरैना जिल्ह्यातील शनिचरा गावचे सरपंच जंडेल सिंग गुर्जर यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात महिलेचे आरोपी सरपंचाशी फोनवरून संभाषण झाले. यानंतर सरपंचाने संबंधित महिलेला फोन करून बोलावले आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर मिळवून देण्याचे सांगून गाडीत बसवले.

महिलेचा गंभीर आरोप महिलेचे म्हणणे आहे की, आरोपी तिला साताऊ येथील जंगलात घेऊन गेला. येथे त्याने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो जंगलात सोडून पळून गेला. घटनेनंतर पीडित महिला रस्त्यावर पोहोचली. ये-जा करणाऱ्यांच्या मदतीने ती ग्वालियरला आली. येथे तिने घरच्यांना संपूर्ण घटना सांगितली. 

अपहरणाचा गुन्हा दाखल यानंतर पीडित महिला कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. ही घटना आंतर पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी महिलेला आंतरी पोलिसांत तक्रार करण्यासाठी पाठवले. पोलिसांनी पीडित महिलेच्या आरोपावरून सरपंच जंडेल सिंग गुर्जरविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीgwalior-pcग्वालियरPoliceपोलिसsarpanchसरपंच