"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:44 IST2025-09-19T18:44:13+5:302025-09-19T18:44:53+5:30

संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे, वाहतूक खोळंबल्याने पोलिसही घटनास्थळी पोहोचले अन्...

A woman started a protest on the streets of Gujarat cause of Only 4 pani puris were given instead of 6 worth Rs 20 | "20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

रस्त्याच्या मधोमध बसून रडत असलेली एक महिला आणि तिला बघून आपला वेग कमी करत रस्त्यावरून जाणारी वाहने. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. खरे तर, 20 रुपयांत 6 ऐवजी फक्त 4 पाणीपुरी दिल्याने, ही महिला संतापली आणि तिने रस्त्याच्या मधोमधच धरणे आंदोलन सुरू केले, असा दावा केला जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, हा व्हिडिओ वडोदरातील सुरसागर तलाव परिसरातील आहे. ही महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरीच्या ठेल्यावर गेली होती. तिथे तीने पाणीपुरी खाल्ली. तिचा आरोप होता की, पाणीपुरीवाला 20 रुपयांत 6 पाणीपुरी देतो. मात्र, तिला केवळ चारच दिल्या गेल्या.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही महिला न्याय मिळवण्यासाठी रस्त्याच्या अगदी मधोमध धरणे धरून बसली आहे. ती रडताना दिसत आहे. एवढेच नाही, तर तीने रडत-रडत आपले दुखःही सांगितले. पाणीपुरीवाला दादागिरी करतो, तेथीन त्याचा ठेला हटवण्यात यावा, असेही तीने म्हटले आहे.

संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे, वाहतूक खोळंबल्याने पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कसी तरी महिलेची समजूत काढली आणि तिला रस्त्यावरून हटवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंटदेखील येत आहेत. काही लोक महिलेप्रति सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत. एक ग्राहक म्हणून तिच्या या कृतीला योग्य ठरवत आहेत.

Web Title: A woman started a protest on the streets of Gujarat cause of Only 4 pani puris were given instead of 6 worth Rs 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.