शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक सावित्री! पतीला वाचवण्यासाठी पत्नीने लावली जीवाची बाजी; ४० फूट विहिरीत मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:17 IST

पती-पत्नी दोघेही विहिरीत होते, तोपर्यंत स्थानिकांनी फायर ब्रिगेडला कॉल करून मदतीला बोलावले

एर्नाकुलम - केरळच्या एर्नाकुलम इथं एका पत्नीने पतीला वाचवण्यासाठी ४० फूट खोल विहिरीत उतरली. ६४ वर्षीय रामेसन बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडले होते त्यावेळी कुठलाही विचार न करता पत्नीने पतीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्यानंतर बचावासाठी आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी दोघांनाही सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. 

पिरावोम नगरपालिकेतील निवृत्त अधिकारी रामेसन हे त्यांच्या अंगणातील एका विहिरीजवळ उभे राहून मिरच्या तोडत होते. त्यावेळी ज्या झाडाच्या फांदीवर ते पाय ठेवून उभे होते, ती तुटली त्यामुळे रामेसन यांचा तोल बिघडला आणि ते विहिरीत पडले. ही विहिर ४० फूट खोल होती. त्यात ५ फुटापर्यंत पाणी होते. रामेसन यांच्या पत्नीने ही घटना पाहिली तेव्हा ती धावत विहिरीजवळ आल्या. त्यांनी बाकी काही विचार न करता रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरल्या. त्यांनी रामेसन यांना फायर ब्रिगेडची गाडी येत नाही तोपर्यंत पकडून धरले होते. 

विहिरीत उतरण्यापूर्वी पत्नीने पतीला बाहेर काढण्यासाठी प्लास्टिकची रस्सी खाली फेकली परंतु पतीला दुखापत झाल्याने त्यांना वरती येता आले नाही. तेव्हा पत्नीने आसपासच्या लोकांना सांगून मदतीसाठी फायर ब्रिगेडला बोलावले त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरल्या. रस्सीच्या मदतीने पत्नी पद्मन विहिरीत उतरत होत्या, मात्र त्यांच्या हाताची पकड सैल झाल्याने त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. पत्नी पद्मन यांनी  पतीला पाण्याबाहेर काढून एका दगडाला टेकून उभ्या राहिल्या होत्या. 

पती-पत्नी दोघेही विहिरीत होते, तोपर्यंत स्थानिकांनी फायर ब्रिगेडला कॉल करून बोलावले. फायर ब्रिगेडचं पथक घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी रस्सी आणि जाळीच्या मदतीने दोघांना वाचवले आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. या दोघांना किरकोळ जखमा झाल्या असून सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने केलेल्या धाडसाचं नेटिझन्स कौतुक करत आहेत. 

 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदार