शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 10 दिवसांनंतर मृतदेह सापडला 'कबरीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:49 IST

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बोकारो : झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी कबर खोदून मृतदेह पुरला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला आहे. ही धक्कादायक घटना जराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुम्हारडीह गावातील आहे. 22 जानेवारी रोजी बेपत्ता असलेल्या महिलेच्या 40 वर्षीय पतीचा मृतदेह महिलेच्या प्रियकराच्या घराजवळील कबरीतून बाहेर काढण्यात आला.

मृत उमा शंकर राय 22 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचा भाऊ रंजीत राय यांनी 25 जानेवारी रोजी पोलिसांत याप्रकरणाची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली. तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मृत उमा शंकर यांची पत्नी सीता देवी हिचे गावातील राहुल कुमार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. 

पत्नीचे सुरू होते प्रेमसंबंध उमाशंकर यांच्या अनुपस्थितीत राहुल सीतेला भेटण्यासाठी घरी जात असे. अशातच एके दिवशी उमाशंकर यांनी दोघांनाही घरात रंगेहाथ पकडले. यादरम्यान उमा शंकर आणि राहुल यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होऊ लागले. दरम्यान, 22 जानेवारी रोजी उमाशंकर अचानक बेपत्ता झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या घरासमोरील कबरीतून उमा शंकर यांचा मृतदेह बाहेर काढला. 

पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा शंकर यांची हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या माहितीवरून दंडाधिकारी नरेश रजक यांच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सीता आणि राहुल कुमार यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. हत्या केव्हा आणि कशी झाली, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :JharkhandझारखंडPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूArrestअटक