शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

विमानतळावर 'वॉर रूम' उभारणार; उड्डाणाला होणारा विलंब अन् प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन SOP

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:43 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला.

नवी दिल्ली: दाट धुक्यामुळे उड्डाण विलंबाच्या अलीकडील घटना लक्षात घेता, विमान नियामक संस्था DGCA ने सोमवारी सर्व विमान कंपन्यांसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि उड्डाण सेवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी कृती आराखडा सादर केला.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, आमच्याकडे सहाही मेट्रो शहरांच्या विमानतळांचे दैनंदिन अहवाल आहेत. यासोबतच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा अहवालही आहे. याशिवाय या एसओपींवर नियमितपणे नजर ठेवली जाईल. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी या सहा मेट्रो विमानतळांवर विमानतळ आणि एअरलाईन ऑपरेटर्सद्वारे 'वॉर रूम' तयार केल्या जातील. यासोबतच पुरेशा सीआयएसएफ दलाची उपलब्धता नेहमीच सुनिश्चित केली जाईल.

दिल्ली विमानतळावरील कॅट-३ धावपट्टी 29L/11R आजपासून सुरु करण्यात आली आहे. यासोबतच धावपट्टी 10/28 देखील कॅट-३ सुसज्ज करण्यात येणार आहे. हे सहा मेट्रो विमानतळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद आहेत, अशी माहिती सिंधिया यांनी दिली. यासोबतच विमानाला उशीर होण्याचे कारणही समोर आणणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विमानाच्या उड्डाणाच्या विलंबाची माहितीही दिली जाईल. या नव्या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय आहेत, पाहा...

  • सर्व ६ मेट्रो विमानतळांसाठी दिवसातून तीन वेळा अहवाल मागवण्यात आला आहे.
  • SOP आणि CAR चे निरीक्षण केले जाईल आणि नियमितपणे अहवाल दिला जाईल.
  • विमानतळांवर 'वॉर रूम' उभारण्यात येणार आहेत.
  • ६ मेट्रो विमानतळावरील एअरलाईन ऑपरेटर यांना प्रवाशांच्या गैरसोयीच्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगितले आहे.
  • CISF ची उपलब्धता 24 तास सुनिश्चित केली जाईल.
  • RWY 10/28 हे री-कार्पेटिंगनंतर दिल्ली विमानतळावर कॅट-३ म्हणून देखील ऑपरेट केले जाईल.
टॅग्स :airplaneविमानair pollutionवायू प्रदूषणdelhiदिल्लीAirportविमानतळCentral Governmentकेंद्र सरकार