शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात गेला अन् कान धरून माफी मागून 3 लाख रूपयांची केली चोरी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 12:52 IST

दिल्लीतील मधु विहार परिसरातील मयुरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील मधु विहार परिसरातील मयुरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरातचोरीची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने देवासमोर हात जोडून कान पकडून माफी मागितली. नंतर दानपेटीचे कुलूप तोडून तीन लाख रुपये लंपास केले. सोबतच त्याने पितळी घंटा देखील चोरून नेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याआधारे पोलीस आता चोरट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मंदिराच्या पाठीमागील लोखंडी गज कापून चोरट्याने आत प्रवेश केल्याचे मयुरध्वज सोसायटीतील लोकांनी सांगितले. 2 तास मंदिर परिसरात थांबून ही घटना घडल्याचा अंदाज लोकांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या भागात क्वचितच गस्त घालतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून या परिसरात रोजच गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

दरम्यान, चोरीच्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, गुन्हेगार हात जोडताना दिसत आहे. यादरम्यान तो मंदिरात काही संशयास्पद कृत्य करताना दिसत आहे. पूजास्थळाच्या बाहेर पडदा दिसतो. येथे काही घंटाही लटकलेल्या दिसत आहेत. पडद्याआड गेल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसत नाही. पण चोरट्याने दानपेटीतून 3 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. 

लोकांनी पोलिसांत केली तक्रार स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, सकाळी लोक मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते तेव्हा ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. देणगी पेटीचे कुलूप तुटल्याचे लोकांनी पाहिले. तसेच पूजेच्या वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या दिसल्या. घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील इतर लोकही मंदिरात जमा झाले. त्यांनी फोन करून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात चोरीची घटना घडली असून लवकरच चोरट्याचा शोध लावला जाईल.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलtheftचोरीdelhiदिल्लीTempleमंदिरPoliceपोलिस