शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला मारहाण करून केली हत्या, मुलाची आईही गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:25 IST

कर्नाटकातील गदग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गदग : कर्नाटकातील गदग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर गदग जिल्ह्यातील हदली गावात कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकाने रॉडने चौथीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. लक्षणीय बाब म्हणजे त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या मुलाच्या आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र शिक्षकाने तिलाही जखमी केले. लोखंडी रॉडने विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर शिक्षकाने त्याला खिडकीतून खाली फेकून दिल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. मुथप्पा हदगली असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मात्र दुर्दैवाने या मारहाणीत संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील हदली गावात सोमवारी मुथप्पा या कंत्राटी शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मुथप्पाने त्याला लोखंडी रॉडने मारहाण करून पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. या आरोपी शिक्षकाला रोखण्याच्या प्रयत्नात मृत मुलाची आई देखील जखमी झाली असून ती त्याच शाळेत शिक्षिका आहे. परंतु आरोपी शिक्षक मुथप्पा हा फरार आहे.

मुलाला वाचवताना आई गंभीर जखमी पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना नरगुंड तालुक्यातील हदली या गावातील आहे. इथे मुथप्पा या शिक्षकाने 10 वर्षीय भरतला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. याशिवाय आरोपी शिक्षकाने मृत मुलाची आई गीता बाराकेरा यांना देखील गंभीर जखमी केले. गीता याच शाळेत एक कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

आरोपीने आणखी एका शिक्षकाला केली मारहाण आरोपी शिक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे अन्य शिक्षक एन पाटील यांनाही मारहाण केली. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Karnatakकर्नाटकTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूStudentविद्यार्थी