म्हणे प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप, विव्हळणाऱ्या रुग्णाला पाहून डॉक्टरही अवाक्, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:59 IST2023-04-07T15:37:23+5:302023-04-07T15:59:44+5:30
Uttar Pradesh News: मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेल्या तरुणाने शौचाला बसलो असताना सापाने दंश केला, तसेच त्यानंतर तो साप प्रायव्हेटपार्टमधून पोटात घुसला असा दावा केला, त्याचं म्हणणं ऐकून डॉक्टरांच्याही भुवया उंचावल्या.

म्हणे प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप, विव्हळणाऱ्या रुग्णाला पाहून डॉक्टरही अवाक्, त्यानंतर...
उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात एका तरुणाने केलेल्या अजब दाव्यामुळे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर अवाक् झाले. सोमवारी रात्री मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेल्या तरुणाने शौचाला बसलो असताना सापाने दंश केला, तसेच त्यानंतर तो साप प्रायव्हेटपार्टमधून पोटात घुसला असा दावा केला, त्याचं म्हणणं ऐकून डॉक्टरांच्याही भुवया उंचावल्या. त्या तरुणाचा आरडाओरडा आणि गंभीर प्रकृती पाहून त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तसेच त्याची दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीच सापडलं नाही.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास कोतवाली परिसरातील बनियानी पुरवा गावातील रहिवासी महेंद्र (२५) याला घेऊन काही नातेवाईक हरदोईच्या मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. हा तरुण उघड्यावर शौचास गेला होता. तिथे त्याला काळ्या रंगाचा साप चालावा आणि त्यानंतर हा विषारी साप प्रायव्हेट पार्टमधून त्याच्या पोटात घुसला, असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले.
तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनाही वेदनेने तडफडत असलेल्या तरुणाने हीच गोष्ट सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी तरुणाच्या संपूर्ण शरीराची पाहणी केली. मात्र त्यामध्ये त्यांना काही खास दिसून आलं नाही. मात्र त्यांनी पीडित तरुणाला रुग्णालयात दाखल करून घेत वेदनाक्षमक औषध दिले.
मेडिकल कॉलेजमध्ये तैनात असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, सदर तरुण हा व्यसनाधीन वाटत होता. तसेच त्याच नशेमध्ये त्याला कधी कधी पोटामध्ये वेदना होत असल्याचे जाणवे. तीच बाब त्याने कुटुंबीयांना सांगितली. घाबरलेले कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन आले. तिथे त्याचं सिटीस्कॅन केलं असता सर्व काही सामान्य असल्याचं दिसून आलं. त्यानंतर बाहेर अधिक तपासणी करण्याचं सांगून त्याला रुग्णालयातून घेऊन गेले. दरम्यान, व्यसनाधीनतेमुळे हा तरुण अशा प्रकारचा दावा करत असावा, असे त्यांनी सांगितले.