शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! २१ जणांना अटक; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, ५ मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:28 IST

पोलिसांनी बाल तस्करी आणि सेक्स रॅकेटवर कारवाई केली आहे.

मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अरूणाचल प्रदेशच्या पोलिसांना अखेर यश आले. पोलिसांनी बाल तस्करी आणि सेक्स रॅकेटवर (Crackdown On Child Trafficking And Sex Racket) कारवाई केली आहे. या कारवाईत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. खरे तर आरोपींमध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आणि आरोग्य सेवा संचालनालयातील उपसंचालकांसह अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील दहा दिवसांत राजधानी इटानगर आणि आसपासच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली आहे.

सेक्स रॅकेटच्या जाळ्यातून सुटका करण्यात आलेल्या पाच मुलींपैकी एक १० वर्षांची, एक १२ वर्षांची आणि तीन मुलींचे वय १५ आहे. सर्व पाच मुलींची आसाममधील गावांमधून तस्करी करून त्यांना इटानगर येथे आणण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, दहा आणि बारा वर्षांच्या दोन मुलींची वयाच्या आठव्या वर्षी इटानगर येथे तस्करी करण्यात आली होती.

२१ जणांना अटकदरम्यान, अटक करण्यात आलेल्या २१ जणांपैकी १० जणांवर तस्करी करणे, ग्राहकांची मागणी करणे आणि पीडितांना ग्राहकांकडे नेण्याचे आरोप आहेत. उर्वरित ११ लोकांची 'ग्राहक' म्हणून ओळख पटली आहे, ज्यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, अशी माहिती वृत्तसंस्था इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. 

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आम्हाला ४ मे रोजी लहान मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीची माहिती दिली. प्राथमिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. शेजारच्या राज्यांमधून अल्पवयीन मुलींना आणले जात असल्याचे निदर्शनास आले. मग २ ठिकाणी छापे टाकून ४ मुलींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना ही टोळी देखील सापडली. या टोळीचे नेतृत्व दोन बहिणी करत होत्या, एक पुष्पांजली, जी इटानगरमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती आणि दुसरी जी मूळची आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील आहे ती मदत करत होती. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी