शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणूक काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, ‘आयएमडी’चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:39 IST

लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे/नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीयहवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही मध्य आणि पश्चिम भारताला अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामानविषयक अंदाज जारी केला. महाराष्ट्रातही तापमान वाढणार  १९ व २६ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील काही मतदारसंघात मतदान होत आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्प्यात १३ मे रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मतदान होत आहे, तर पाचवा टप्पा २० मे रोजी उत्तर महाराष्ट्र, मुंबई परिसरात मतदान होणार आहे. या भागातील सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बंगालमध्ये वादळाचे थैमान; ५ जणांचा मृत्यूपश्चिम बंगालसह आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये रविवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये बसला. येथे पाच जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. त्याशिवाय शयजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी येथेही वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली. 

देशात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याने आणि लोकसभेच्या निवडणुकाही असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचे नागरिकांनी पालन करावे. - किरण रिजिजू, केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री

टॅग्स :weatherहवामानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Indiaभारत