५० मीटर आधीच आयुष्याची रेस कायमची संपली; हाफ मॅरेथॉनमध्ये अचानक कसा झाला मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 11:27 IST2023-10-16T11:27:25+5:302023-10-16T11:27:48+5:30
आयोजकांनी आशिषच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

५० मीटर आधीच आयुष्याची रेस कायमची संपली; हाफ मॅरेथॉनमध्ये अचानक कसा झाला मृत्यू?
नवी दिल्ली – हाफ मॅरेथॉनमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना त्यात एक दु:खद बातमी समोर आली. १० किमीच्या खुल्या स्पर्धेत सहभागी धावपटू आशिष कुमार गर्गचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली. तेव्हा आशिष फिनिशिंग लाईनच्या ५० मीटर आधीच खाली कोसळला अशी माहिती आयोजकांना दिली आहे.
स्पर्धेच्या आयोजनात असलेले मेडिकल डायरेक्टर्स डॉ. समीर गुप्ता आणि सोनिया लाल गुप्ता यांनी सांगितले की, मेडिकल अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन करत आवश्यक ती आरोग्य सुविधा आशिषला दिली होती. धावपट्टीवरच त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. पल्सही पडू लागले. त्यानंतर तातडीने सीपीआर देण्यात आला. त्यानंतर मेडिकल बेस कॅम्पमध्ये आयसीयूत पुढील उपचारासाठी आशिषला शिफ्ट केले. जिथे त्याची तब्येत स्थिरावली.
काही वेळाने मूलचंद हॉस्पिटलमध्ये आशिषला नेण्यात आले. परंतु त्याची तब्येत बिघडल्याने त्याला वाचवणे शक्य झाले नाही. मूलचंद हॉस्पिटलमध्ये पुन्हा आशिषला हृदयविकाराचा झटका आला ज्यात त्याचा मृत्यू झाला. आयोजकांनी आशिषच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
धावताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
ज्यादिवशी तुम्ही धावणार आहात त्याच्या एक आठवड्याआधीपासून भरपूर प्रमाणात पाणी प्या.
पाणी, लिंबू पाणी, नारळ पाणी प्यायला हवे.
मॅरेथॉनच्या २-३ दिवस आधी कार्बोहाइट्रेडचे प्रमाण वाढवा.
ज्यादिवशी मॅरेथॉन असेल तर त्या रात्री चांगली झोप घ्या.
सुरुवातीला आराम करून घ्या
जोशात आधी वेगाने सुरुवात करू नका. त्यामुळे थकवा लागून तब्येत ढासळू शकते.
प्रोफेशनल धावपटूसारखा प्रयत्न करू नका.
रिकाम्या पोटी धावू नका किंवा जास्त जेवण करूनही धावू नका.