उत्तर प्रदेशमध्ये एका नवशिका चालकाने शंभरच्या स्पीडने कार चालवली. जास्तीच्या स्पीडमुळे त्याचा ताबा सुटला, यामुळे सर्व विद्यार्थी गंभीर जखमी झाले. रस्त्यावर रक्ताने माखलेल्या विद्यार्थिनींना पाहून गोंधळ उडाला. या मुलींची संख्या जास्त आहे. या मुली शिर्डी साई शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे.
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; निकालापूर्वी अरविंद केजरीवालांच्या घरी ACB चे पथक दाखल
सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे हद्दीतील रामगंगा विहारमध्ये ही घटना घडली. लोकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी विद्यार्थ्यांना विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा पाठलाग करुन त्याने कारची धडकी दिली. गाडीत पाच तरुण बसले होते. गाडी थांबताच चार तरुण पळून गेल्याचा दावा त्यांनी केला.
हा अपघात दुपारी १२ वाजताच्या सुमारास रामगंगा विहारमधील गोल्डन गेट आणि आनंदम सिटी हाऊसिंग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, हाय स्ट्रीटच्या अगदी आधी घडला. बलेनो कारमध्ये ५ तरुण बसले होते. शगुन नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्या परेजा, दिव्यंशु, उदय, कौशिक यश सिरोही तरुणही तिथे होते जे पळून गेले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
पालकांनी सांगितले की, आज विद्यार्थ्यांचा शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेतून बोर्ड परीक्षेचे ओळखपत्र मिळाल्यानंतर, मुली हाय स्ट्रीटवर पोहोचल्या. मुली गोल्डन गेट रोडवरील आनंदम सिटीसमोरील रस्त्यावरून चालत होत्या. दरम्यान, पाच तरुण त्यांच्या मागे येऊ लागले. हे पाहून विद्यार्थी तेथून निघून जाऊ लागल्या होत्या. यावेळी या तरुणांनी कार स्पीडने चालवली आणि विद्यार्थ्यांच्या दिशेने घेऊन आले. हा अपघात नाही, त्या तरुणांनी जाणून बुजून कार अंगावर चढवली आहे. त्या तरुणाने हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.