भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:14 IST2026-03-30T19:00:04+5:302026-03-30T19:14:45+5:30

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या उपक्रमाचे वर्णन भारताच्या ऊर्जा प्रवासातील एक "नवा अध्याय" असे केले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

A new era begins in India's energy sector Mineral oil discovered in an area of 2.6 lakh square km; A big decision by the central government | भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशांतर्गत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननाचा नवा टप्पा खुला केला आहे. सरकारने 'ओपन एक्रेज लायसन्सिंग पॉलिसी' (OALP) चा ११ वा टप्पा (Round-XI) लाँच केला असून, याद्वारे सुमारे ८०,२२८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले २१ ब्लॉक्स लिलावासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका, युद्धात मध्यस्थीसाठी भारत सहभागी होऊ शकतो; इराणनं दाखवला विश्वास

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या उपक्रमाचे वर्णन भारताच्या ऊर्जा प्रवासातील एक "नवा अध्याय" असे केले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली आहे. ओएएलपी-१० आणि ओएएलपी-११ या दोन्ही टप्प्यांचा विचार करता, आता एकूण २,६२,८१७ चौरस किलोमीटर क्षेत्र उत्खननासाठी खुले झाले आहे. यापूर्वीच्या १० व्या टप्प्यात (OALP-10) सुमारे २५ ब्लॉक्सचा समावेश होता, याचे क्षेत्रफळ १,८२,५८९ चौरस किलोमीटर होते. आता ११ व्या टप्प्याच्या भर पडल्यामुळे जमिनीवरील आणि समुद्रातील उत्खननाच्या संधींचा मोठा विस्तार झाला आहे.

"हा निर्णय आपल्या जमीन आणि समुद्राखालील अफाट ऊर्जा साठ्यांचा शोध घेण्यासाठी उचललेले एक निर्णायक पाऊल आहे. हे पाऊल देशाची वाढ, लवचिकता आणि स्वावलंबनाला पाठबळ देणारे ठरेल." हा प्रयत्न सरकारी बोली प्रक्रियेला गती देण्याच्या आणि अन्वेषण उपक्रम वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे, असेही पुरी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारने या लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

अर्ज भरण्यास सुरुवात

३० मार्च २०२६, दुपारी २:०० वाजेपासून

अर्ज भरण्याची अंतिम मुदत

 २९ मे २०२६, दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

Web Title : भारत में तेल अन्वेषण के साथ ऊर्जा क्षेत्र में नए युग की शुरुआत

Web Summary : भारत ने घरेलू ऊर्जा उत्पादन को बढ़ावा देने के लिए ओएएलपी राउंड-XI लॉन्च किया, जिसमें 80,228 वर्ग किमी में फैले 21 ब्लॉकों की नीलामी की जाएगी। इस पहल का उद्देश्य ऊर्जा सुरक्षा को मजबूत करना और आयात निर्भरता को कम करना है, अब 2,62,817 वर्ग किमी क्षेत्र अन्वेषण के लिए खुला है। आवेदन 30 मार्च, 2026 से शुरू।

Web Title : India Launches New Era in Energy with Oil Exploration

Web Summary : India boosts domestic energy production, launching OALP Round-XI, auctioning 21 blocks covering 80,228 sq km. This initiative aims to strengthen energy security and reduce import dependence, opening 2,62,817 sq km for exploration. Application starts March 30, 2026.