जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:09 IST2025-06-27T11:08:47+5:302025-06-27T11:09:18+5:30
Jagannath Rath Yatra Elephant Chaos: रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे.

जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
अहमदाबादच्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना होता होता टळली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १८ हत्तींच्या गटाचे नेतृत्व करणारा हत्तीच बिथरल्याने मोठी धावपळ उडाली होती. ऐन गर्दीत हत्ती बिथरल्याने तो सैरावैरा धावू लागला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोकही पळू लागले. वन विभागाने वेळीच या हत्तीला नियंत्रित केले आणि रथयात्रेपासून बाजुला नेले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
ही रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान भगवानांच्या तिन्ही मूर्ती रथावर विराजमान झाल्या. रथाच्या पुढील बाजुला सोन्याचा झाडू ठेवण्यात आला आहे. नित्यविधीनंतर सकाळी ९:३० वाजता भगवानांना मंदिरातून बाहेर काढण्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. पुजेनंतर बलभद्र, बहीण सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ रथात बसणार आहेत.
#Gujarat: Three elephants go out of control during Jagannath Rath Yatra in Ahmedabad.#Jagannath#JagannathYatra#elephantspic.twitter.com/Kg2OHGlfTj
पुरी राजघराण्यातील गजपती दिव्या सिंह देव हे सोन्याच्या झाडूने रथाचा पुढचा भाग झाडून रथयात्रेला सुरुवात करतील. हा रथ सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात नेला जातो. येथे जगन्नाथाच्या मावशीचे स्थान असल्याची मान्यता आहे. आजच्या रथयात्रेत १८ हत्ती, भारतीय संस्कृतीशी संबंधित १०१ रथ, ३० आखाडे, १८ भजन पथके आणि ३ बँड पथकांचा समावेश आहे. या यात्रेला मोठा भाविकांचा मोठा जनसागर उसळला आहे.