शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीच्या 24 वर्षीय प्रियकराला घरी बोलावून जागीच संपवलं; 20 तुकडे करून फेकलं झुडपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 13:52 IST

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे 20 तुकडे करून हे तुकडे चार गोण्यांमध्ये भरून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या कालव्याच्या काठावरील झुडपात फेकून दिले. याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी या हत्येचा खुलासा करून आरोपीला अटक केली आहे.

रिक्षाचालक मिलाल (34) याने पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, आरोपीला आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचा पश्चात्ताप नाही. खरं तर ही घटना गाझियाबाद जिल्ह्यातील लोधी चौकातील आहे. आरोपी मिलालने 19-20 जानेवारीच्या मध्यरात्री पत्नी पूनमचा प्रियकर अक्षय (24) याची हत्या केली. अक्षय हा मूळचा राजस्थानमधील कोटपुतली येथील आहे. माहितीनुसार, अक्षय एक वर्षापूर्वी खोडा येथे राहत होता आणि रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा.

यादरम्यान तो मिलालच्या घरी जाऊ लागला आणि त्याने मिलालची पत्नी पूनमशी जवळीक साधली. मिलालने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याची 7 वर्षांची मुलगी रेखा हिला घरातच जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीच्या पत्नीला रोज मुलीकडे जावे लागत होते, तर पती रिक्शा चालवायला जायचा. त्यामुळे पत्नी पूनमला घरात असलेल्या 2 मुली आणि एका मुलाची सतत काळजी वाटायची.

पत्नीची अशी घेतली मदत पत्नीची काळजी पाहूनच आरोपी पतीने कट रचला आणि काही दिवसांसाठी अक्षयला राजस्थानमधून बोलवायला पत्नीला सांगितले. पत्नीने अक्षयला बोलावले आणि 19 जानेवारीला तो गाझियाबादला पोहोचला. चौकशीदरम्यान आरोपी मिलालने सांगितले की, त्याने कट रचून सर्व तयारी केली होती आणि पूनमला तिच्या मुलीकडे रुग्णालयात जाण्यास सांगितले. पूनम निघून गेल्यानंतर मिलालने अक्षयच्या खोलीत पोहोचून त्याच्या मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात 24 वर्षीय अक्षयचा जागीच मृत्यू झाला. 

मृतदेहाचे केले 20 तुकडे आरोपी मिलालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने अक्षयवर वार करून त्याची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे केले. तसेच त्याने याबाबत मुलांनाही काहीच कळू दिले नाही आणि सकाळी मुले उठली तेव्हा त्यांना सांगितले की काका रात्रीच घरी परतले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटकPoliceपोलिस