शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीच्या बाजूने छुपी लाट; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 10:09 IST

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

बलवंत तक्षक -

नवी दिल्ली : काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. समाजात द्वेष व फूट पसरवणाऱ्या भाजप व आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढत जनताच आता आमच्यासाठी आहे, असा दावाही खरगे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. 

‘देशभर फिरल्यानंतर, आमच्या बाजूने छुपी लाट असल्याची जाणीव होत आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील भागीदारांना यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही भाजपला जागा मिळण्यापासून रोखू शकू. मला वाटते की, भाजप आपले सरकार स्थापन करू शकणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याची हाक ही सर्व भारतीयांचे मूलभूत हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी आहे. खरगे म्हणाले की, २००४ मध्येही अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या; परंतु यूपीए सरकारने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात दोन कार्यकाळ पूर्ण केले.

महगाई आणि बेरोजगारी दोन प्रमुख मुद्देया निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारी, हे दोन प्रमुख मुद्दे समोर आले असून त्यामुळे लोकांत नाराजी आहे. आरक्षण आणि राज्यघटना हे दोन मुद्देही कळीचे ठरत आहेत. दोन कोटी नोकऱ्या, परदेशातील काळा पैसा परत आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, याआधी दिलेली आश्वासनेही भाजप पूर्ण करू शकलेली नाही, असेही खरगे म्हणाले.  

त्यांना लोकशाही संपवायचीजगाधारी (हरयाणा) : भाजपला लोकशाही संपवायची आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी येथील प्रचारसभेत केला. काँग्रेस आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढत आहे. तुम्ही राज्यघटना हिसकावून घेत आहात आणि आम्ही त्याविरोधात लढत आहोत. तुम्हाला लोकशाही संपवायची आहे आणि आम्ही त्यासाठी लढत आहोत, असे खरगे म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा