शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली एम्समध्ये भीषण आग! सुदैवाने जीवितहानी नाही; रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:23 IST

दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली.

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आपत्कालीन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे कळते. अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी पोहोचले असून सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एम्सच्या एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना जुन्या इमारतीत पाठवण्यात येत असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत असून लवकरात लवकर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार, ११.५४ वाजता आग लागली असल्याचे समोर आले, त्यानंतर अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी दाखल झाली. इमर्जन्सी वॉर्डजवळील एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालयfireआगFire Brigadeअग्निशमन दल