मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाचे अघोरी कृत्य; चालत्या ट्रेनसमोर थांबला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 16:08 IST2022-08-17T16:07:26+5:302022-08-17T16:08:07+5:30
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाचे अघोरी कृत्य; चालत्या ट्रेनसमोर थांबला अन्...
उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये आपल्या लहान मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाने एक धक्कादायक पाऊल उचलले. बहिऱ्या मुलाला ठीक करण्यासाठी बाप त्याला घेऊन चक्क ट्रेनसमोर उभा राहिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेन चालकाने ट्रेन थांबवली आणि त्या व्यक्तीला रुळावरुन हटण्यास सांगिले, पण मुलाचा बाप ऐकायला तयार नव्हता.
सविस्तर माहिती अशी की, उन्नाव जिल्ह्यातील गंजमुरादाबादमधील एक व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन कानपूर-बालामाऊ पॅसेंजर ट्रेनसमोर उभे राहिला. अचानक ट्रेनसमोर आलेल्या बाप-लेकाला पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी ट्रेनचा हॉर्न ऐकण्यासाठी हट्ट त्या व्यक्तीने केला. चालकाने ट्रेन थांबवून त्यांना रुळावरून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाला हॉर्न एकवल्याशिवाय हटणार नसल्याचा आग्रहावर वडील ठाम राहिले.
यानंतर चालकाने हॉर्न वाजवून वडिलांची इच्छा पूर्ण केली. या घटनेमुळे सुमारे पाच मिनिटे ट्रेन थांबवावी लागली. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. बहिऱ्या मुलाला ठीक करण्यासाठी वडिलांनी केलेले कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. ट्रेनचा हॉर्न वारंवार ऐकवला तर कदाचित आपल्या मुलाचे बहिरेपण दूर होऊन त्याला ऐकू येऊ लागेल, असे त्या व्यक्तीला वाटले होते.