शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई करण्यासाठी वेगळी रणनीती! उत्तर प्रदेश आणि तेलंगणात भाजपने वाढविली ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 06:18 IST

जागा घटण्याची शक्यता, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात भाजपने वाढविली ताकद

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये जागा कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये अधिक जागा जिंकण्यासाठी आपली ताकद वाढवली आहे. अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपला वास्तवाचा सामना करावा लागत आहे. 

२०१९ च्या तुलनेत यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांतील जागा कमी झाल्या तर भाजप याची भरपाई उत्तर प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यात करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून ८० पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, यंदा ८० पैकी ८० जागा जिंकण्यासाठी पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. यावेळी बसपाचे उमेदवार अनेक ठिकाणी भाजपचे गणित बिघडवू शकतात. तरीही भाजपला असा विश्वास आहे की, त्यांचे ७० हून अधिक उमेदवार विजयी होऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये २०१९ मध्ये भाजपने ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी या राज्यात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अंतर्गत सर्वेक्षणात काय?- कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, बंगालमधील आकडेवारीनुसार आणि अंतर्गत सर्वेक्षणात जागा कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ मध्ये भाजपने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत असूनही साशंकता आहे. कर्नाटकमध्ये गत निवडणुकीत भाजपने राज्यातील २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. - यावेळी कर्नाटकात अर्ध्या जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही भरपाई करण्यासाठी भाजपने तेलंगणात खूप ताकद लावली आहे. २०१९ मध्ये भाजपने तेलंगणात १७ पैकी तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी या राज्यात अधिक जागा जिंकू असा दावा भाजपने केला आहे. 

येथेही धक्का?हरयाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये भाजपला थोडासा धक्का बसू शकतो. या सर्वांची भरपाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतात अधिक मेहनत घेतली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांकडून काही भरपाई शक्य आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाTelanganaतेलंगणा