२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:46 IST2025-11-12T17:44:48+5:302025-11-12T17:46:04+5:30
दिल्ली स्फोटात वापरल्या गेलेल्या आय२० कारबाबत आता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.

२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
दिल्लीस्फोटांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे महत्त्वाचे मोठे खुलासे होत आहेत. स्फोटात वापरल्या गेलेल्या आय२० कारबाबत आता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. पोलीस उमरच्या मालकीची आणखी एक कार देखील शोधत आहेत. ही कार लाल रंगाची इकोस्पोर्ट असल्याचे समजत आहे. दरम्यान, आय२० बाबत एक नवीन खुलासा समोर आला आहे. ओएलएक्सद्वारे रॉयल कार झोनच्या माध्यमातून या कारशी संपर्क साधण्यात आला होता.
आमिर रशीद नावाच्या एका व्यक्तीने ही कार खरेदी केली होती. कागदपत्रे पुलवामा येथील रहिवासी आमिर रशीद याच्या नावावरच होती. ही कार २९ ऑक्टोबर रोजी खरेदी करण्यात आली होती. ती खरेदी करण्यासाठी दोन लोक आले होते. यातील दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांचा दुसरा साथीदार सोनूने कार दिली होती. ही कार सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती.
२ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीला विकली!
सलमानने ती कार स्पिनीला विकली, ज्याने नंतर ती जेके मोटर्सच्या देवेंद्रला विकली. त्यानंतर त्याने ती जेके मोटर्सकडून कमिशन घेऊन रॉयल कार झोनमार्फत आमिर रशीदला विकली. आय२० ही गाडी दोन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीला विकण्यात आली आणि त्याचे पैसे रोख स्वरूपात देण्यात आले होते. दरम्यान, दिल्ली पोलीस या प्रकरणात दुसरी कार शोधत आहेत आणि अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संशयित कार लाल रंगाची इकोस्पोर्ट आहे, ज्याचा नोंदणी क्रमांक DL10CK0458 आहे आणि ती उमर याच्या नावावर नोंदणीकृत आहे, जो तिचा दुसरा मालक आहे. पाच पोलीस पथके कारचा शोध घेत आहेत. देवेंद्र हा कारचा पहिला मालक होता आणि उमर हा कारचा दुसरा मालक होता. ज्या आय२० कारमध्ये स्फोट झाला, त्याच्या मालकीच्या कागदपत्रात देवेंद्रचे नाव देखील होते. ही तोच देवेंद्र आहे की दुसरी कोणी आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
उत्तर प्रदेश-हरियाणा पोलिसांना पाठवला अलर्ट
दिल्लीतील सर्व पोलीस ठाणे, पोलीस चौक्या आणि सीमा चौक्यांना लाल रंगाची इकोस्पोर्ट कार शोधण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील पोलिसांनाही या लाल रंगाची कारबाबत सतर्क करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासोबत असलेल्या लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारबाबत अलर्ट मिळाला होता. पोलिसांनी तपासणी केली. ही कार आय-२० सोबत कुठेही दिसली नाही. पोलीस अजूनही तिचा शोध घेत आहेत.