प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:59 IST2024-10-31T16:59:22+5:302024-10-31T16:59:47+5:30
पत्नी इतर व्यक्तीसोबत दिसताच पतीचा पारा चढला.

प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेलीच बरी... तसेच प्रेमात दोघात तिसरा आल्यावरही कोण काय करेल याचा निभाव नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीला प्रियकरासोबत पाहताच संतापलेल्या पतीने रेल्वे स्थानकावर एकच राडा घालत संबंधित व्यक्तीची धुलाई केली. विशेष म्हणजे पती पेशाने CRPF जवान तर त्याची पत्नी बिहार पोलीस आहे. पाटणा रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री उशीरा पती-पत्नी यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. खरे तर बिहार पोलिसात कार्यरत असणारी महिला हवालदार पाटणा-सिंगरोली एक्सप्रेस ही गाडी पकडण्यासाठी आली होती. अशातच तिचा पतीदेखील तिथे पोहोचला. महत्त्वाचे म्हणजे, आपली पत्नी अन्य दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसताच पतीचा पारा चढला.
सीआरपीएफ जवान असलेल्या पतीने आपली आपबीती सांगताना बघ्यांसमोर व्यथा मांडली. एक महिन्यापासून पत्नी गायब होती. तिच्याशी संपर्क होत नव्हता. पण, इथे ती दिसली पण तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. मला पाहताच तिने त्याला दूर होण्यास सांगितले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, असे पतीने सांगितले. दरम्यान, सीआरपीएफ जवानाने पत्नीच्या प्रियकराची धुलाई केली. मग तो फरार होताच पती-पत्नी ट्रेनने पुढे निघून गेले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पीडित जवानाचा संताप पाहायला मिळतो. तुझ्यासोबत असणारा व्यक्ती कोण होता? अशी विचारणा करताना तो दिसतो. मात्र त्याची पत्नी अर्थात महिला पोलीस हवालदाने या प्रश्नावर मौन बाळगले. सुरुवातीला पत्नीने आपल्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या जवानाने पत्नीसोबत दिसलेल्या व्यक्तीवर शाब्दिक हल्ला चढवला. याशिवाय त्याने मारहाण करत जमलेल्या गर्दीसमोर आपण सीआरपीएफ जवान असल्याचे सांगून त्या व्यक्तीला चोप दिला.