शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 00:10 IST

ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला.

वंदे भारत एक्सप्रेस, या सेमी हायस्पीड ट्रेनला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. राजस्थानातील अलवर शहरातील काली मोरी गेटजवळ दिल्लीहून अजमेरकडे जात असलेल्या या ट्रेनसमोर अचानकपणे एक गाय आल्याने हा अपघात झाला. ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव शिवदयाल शर्मा (83) असे आहे. ते हिरा बास येथील रहिवासी आहेत. यावेळी तेथे आणखी एक व्यक्तीही उभी होती. पण सुदैवाने तिचा जीव वाचला. यासंदर्भात जीआरपी पोलिसांनी माहिती दिली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदयाल शर्मा रात्रीच्या वेळी टॉयलेटसाठी बाहेर गेले होते. या दरम्यान वेगात असलेल्या ट्रेनला गाय धडकली. याधडकेने गाय दूरवर फेकली गेली. यावेळी गायीखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवार सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे दिला आहे.

23 वर्षांपूर्वी रेल्वेच्या सेवेतूनच झाले होते निवृत्त - शिवदयाल शर्मा हे रेल्वे खात्यात इलेक्ट्रिशन म्हणून कार्यरत होते. जवळपास 23 वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांना दोन मुळे असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसcowगायDeathमृत्यूRajasthanराजस्थान