शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

हरयाणात अशिक्षित आईसाठी चिमुरड्याने बनविले ऐकू येणारे वर्तमानपत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 04:41 IST

गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. हरयाणातील झज्जर जिल्ह्यातील झांसवा गावातील १३ वर्षांच्या कार्तिकनेही आपल्या अनोख्या शोधाद्वारे ते सिद्ध केले.

१३ वर्षांच्या कार्तिकने बनवले ध्वनिचित्र वृत्तपत्र; बातमी क्लिक हाेताच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अँकर करतो वाचन

झज्जर :

गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. हरयाणातील झज्जर जिल्ह्यातील झांसवा गावातील १३ वर्षांच्या कार्तिकनेही आपल्या अनोख्या शोधाद्वारे ते सिद्ध केले. त्याची आई अशिक्षित असल्याने तिला बातम्या वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता.  या समस्येवर उपाय म्हणून कार्तिकने असे ध्वनिचित्र (ऑडिओ व्हिज्युअल) वृत्तपत्र बनविले, ज्यावर बातमी क्लिक होताच कृत्रिम बुद्धिमत्तेवाला (एआय) अँकर ते वाचून काढतो.

या बातमीशी संबंधित व्हिडीओही एकाचवेळी पाहता येतील. कार्तिक नुसता शोध लावून थांबला नाही, तर त्याचे पेटंटही त्याने नोंदविले आहेत. २५ एप्रिल रोजी त्याच्या आईच्या हस्ते या वृत्तपत्राचे प्रकाशन होणार आहे. या पेपरला श्रीकुंज असे नाव देण्यात आले आहे.

वृद्ध, अशिक्षित, दृष्टिहिनांनाही फायदा  तूर्तास तो साप्ताहिक काढणार आहे. त्यात आठवड्यातील माहिती आणि मनोरंजक बातम्या असतील.   कार्तिकने सांगितले की, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो एआयशी कोणताही ई-पेपर जोडून ऑडिओ व्हिज्युअल बनवू शकतो.   परंतु सध्या तो फक्त त्याच्या श्रीकुंज या वृत्तपत्रावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. कार्तिकच्या म्हणण्यानुसार, वृद्ध आणि अशिक्षित लोकांशिवाय अंध लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे.

आई-वडिलांना कौतुकवडील अजित सिंग हे दहावी पास असून, शेती करतात. आई सुशीला या गृहिणी असून, त्यांनाही मुलाचे खूप कौतुक आहे. कार्तिकच्या कौशल्यावर खुश होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कार्तिकला लॅपटॉप भेट दिला होता. त्याच्या मदतीने कार्तिकने वृत्तपत्र तयार केले.

कार्तिकची अफाट कामगिरीकार्तिकने वयाच्या ११ व्या वर्षी ३ ॲप्स बनविले होते. हे तिन्ही ॲप अभ्यासाशी संबंधित आहेत. त्याने कोडिंग वर्ल्ड आणि द वर्ल्ड ऑफ ग्राफिक डिझायनिंग ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. गेल्या वर्षी गिनीज बुकने त्याला आशियातील सर्वात तरुण ॲप डेव्हलपर म्हणून स्थान दिले होते.