जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:13 IST2025-02-06T18:01:55+5:302025-02-06T18:13:52+5:30
राजस्थानची राजधानी जयपूरहून प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणाऱ्या आठ जणांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कारने बसला पाठिमागून धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक जयपूरहून प्रयागराजला महाकुंभात स्नान करण्यासाठी जात होते. हा अपघात दुडू परिसरात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कार आणि रोडवेज बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसचा टायर फुटल्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन कारला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.
'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, जोधपूर रोडवेज डेपोची बस जयपूरहून अजमेरला जात असताना अचानक बसचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक तोडून अजमेरहून जयपूरला येणाऱ्या इकोला धडकली. यामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या ८ जणांचा मृत्यू झाला.
सर्व मृत पुरुष आहेत जे भिलवाडाच्या कोटडी भागातील रहिवासी आहेत. हे लोक प्रयागराजमध्ये महाकुंभ स्नान करण्यासाठी जात होते पण त्यापूर्वीच ते अपघाताचे बळी ठरले. दिनेश रेगर, नारायण, बबलू मेवाडा, किशन, रविकांत, प्रमोद सुथार, बाबू रेगर आणि प्रकाश मेवाडा अशी मृतांची नावे आहेत.
बसमधील प्रवासी मोहन सिंह, माया नायक आणि गुन्नू जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या मदतीने पोलिसांनी बस आणि खराब झालेली कार रस्त्यावरून बाजूला केली आणि वाहतूक पुन्हा सुरू केली. अपघात इतका भीषण होता की बसला धडकल्यानंतर कारचे तुकडे झाले.