मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कपड्याच्या दुकानाच्या चेंजिग रुममध्ये कॅमेरे लावल्याचे समोर आले. ही घटना आदिवासी बहुल शहडोल जिल्ह्यातील आहे. चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा आढळल्यानंतर दुकान मालक आणि त्याच्या मुलाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी महिलांनी कपडे बदलतानाचे काही व्हिडीओ, जे लपलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करून बनवले होते, ते स्थानिक पातळीवर सोशल मीडियावर शेअर होऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जेव्हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला तेव्हा एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला दिसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हे संपूर्ण प्रकरण शहाडोलच्या देवलोंड पोलीस स्टेशन परिसरातील बुधवा या छोट्याशा गावाचे आहे. देवलॉंडचे स्टेशन हाऊस ऑफिसर सुभाष दुबे यांनी सांगितले की, बुधवा येथील रहिवासी कृष्णा पाल सिंह बैस यांनी पोलिसांना लेखी तक्रार दिली.
या तक्रारीमध्ये म्हटले की, बुधवा येथील नारायण दीन गुप्ता यांच्या कपड्यांच्या दुकानातील 'चेंजिंग रूम'मध्ये एक छुपा कॅमेरा बसवण्यात आला होता. या कॅमेऱ्याने चेंजिंग रूम वापरणाऱ्या महिलांचे रेकॉर्डिंग केले जात होते. पोलिसांनी दुकानावर छापा टाकला आणि चेंजिंग रूममध्ये बसवलेला एक छुपा कॅमेरा जप्त केला.
दुकानदाराच्या मुलाने व्हिडीओ व्हायरल केले
महिला कपडे बदलतानाचे फुटेज घेता यावे म्हणून दुकान मालकाने स्वतः हा कॅमेरा बसवल्याचे पोलीस ठाणे प्रभारींनी सांगितले. दुकान मालक हे व्हिडीओ त्याच्या कॉम्प्युटरवर पाहत होता. दुकानदाराच्या मुलाला हे व्हिडीओ कळताच त्यानेही व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. मग त्याने त्याच्या मित्रांसोबत काही व्हिडीओ शेअर केले.
यानंतर, हे व्हिडीओ सुरुवातीला स्थानिक पातळीवर व्हायरल झाले. पोलिसांनी सांगितले की जेव्हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आणि काही व्हिडिओंमध्ये स्थानिक महिला दिसल्या, तेव्हा गोंधळ उडाला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर, दुकान मालक आणि त्याच्या मुलाविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.